Rahul Dravid: द्रविडची होणार तगडी कमाई! आयपीएलमध्ये प्रशिक्षकांना किती वेतन मिळतं?
IPL 2025 Rajasthan Royals: राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात भारताने 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. द्रविड यांना वर्ल्ड कप ट्रॉफीसह निरोप देण्यात आला. त्यानंतर आता द्रविड यांची 'घरवापसी' झाली आहे.
1 / 6
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे. द्रविड यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रक्षिशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल द्रविड यांना हेड कोच म्हणून वेतन मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रविड यांना एका हंगामासाठी 2-3 कोटी रुपये मिळू शकतात.
2 / 6
आयपीएलमध्ये विविध संघाचे हेड कोच पदावर विराजमान असलेल्या दिग्गजांना घसघशीत वेतन मिळतं. रिपब्लिक वर्ल्डनुसार, मुंबई इंडियन्सचा हेड कोच मार्क बाऊचर याला 2.3 कोटी रुपये मिळतात.
3 / 6
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एंडी फ्लावर यांनाही गलेलठ्ठ वेतन मिळलं. रिपोट्सनुसार, फ्लावर यांना एका हंगामासाठी 3.2 कोटी मिळतात.
4 / 6
न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग चेन्नई सुपर किंग्सलचा हेड कोच आहे. फ्लेमिंगला सीएसकेकडून 3.5 कोटी रुपये मिळतात. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
5 / 6
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने कोचिंगद्वारे चांगली कमाई केली. मात्र आता रिकी पॉन्टिंग दिल्ली कॅपिटल्सपासून वेगळा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, 3.5 कोटी रुपये मिळायचे.
6 / 6
दरम्यान आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी (2025) अनेक संघांनी कोचिंग स्टाफमध्ये बदल केले आहेत. तसेच मेगा ऑक्शननंतर आणि आधीही कोचिंग स्टाफमध्ये बदल होऊ शकतात.