टीम इंडियापासून दूर असलेल्या इशान किशनने आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार शतक ठोकले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त 45 चेंडूत शतक झळकावून त्याची जुनी शैली दाखवली. त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
इशान यंदाच्या 18 व्या मोसमात शतक करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला. इशानने अवघ्या 45 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. इशानने 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने आणि 222.22 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं.
इशानने या शतकी खेळीत फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 16 चेंडूत 76 धावा केल्या.
हैदराबादने इशानला 11.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते आणि पहिल्याच सामन्यात इशानने तो फायदेशीर करार असल्याचे सिद्ध केले आहे.गेल्या हंगामानंतर मुंबईने इशानला रिलीज केले होते आणि नंतर मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला 11.25 कोटी रुपयांना विकत घेतले.
इशान किशनच्या आयपीएल कारकिर्दीत 29.57 च्या सरासरीने आणि 137.98 च्या स्ट्राईक रेटने 2750 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. इशान सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात लायन्सचा भाग होता. (सर्व फोटो- सनरायझर्स हैदराबाद ट्वीटर)