रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार कोण? लिलावानंतर चित्र झालं स्पष्ट
आयपीएल 2025 स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडली. आरसीबीने रिटेन्शननंतर यादीनंतर 19 खेळाडूंवर बोली लावली. विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना रिटेन केलं होतं. लिलावात खेळाडू घेतल्यानंतर कर्णधारपदाचं चित्रही स्पष्ट झालं आहे.
1 / 5
आयपीएलच्या 18व्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ सज्ज झाला आहे. आतापर्यंतच्या 17 पर्वात एकदाही जेतेपद मिळवता आलेलं नाही. पुन्हा एकदा आरसीबी संघ जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. आरसीबीने यासाठी संघाची बांधणी केली आहे. पण कर्णधारपद कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा आहे.
2 / 5
आरसीबीने फाफ डु प्लेसिसला रिलीज केलं आहे. त्यात मेगा लिलावात कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा एकही खेळाडू दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कर्णधारपदाची माळ विराट कोहलीच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.
3 / 5
विराट कोहलीने 2013 ते 2021 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. 2022 मध्ये कर्णधारपद सोडल्यानंतर फाफने धुरा सांभाळली. पण त्याला रिलीज केलं असून दिल्ली कॅपिटल्सने घेतलं आहे. त्यामुळे विराट कोहली हा एकमेव पर्याय उरतो
4 / 5
आरसीबीकडे जेतेपद मिळवण्याची यावेळी चांगली संधी आहे. कारण आरसीबीच्या ताफ्यात यावेळी चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे फलंदाजीसोबत गोलंदाजीला धार मिळणार आहे. मागच्या काही पर्वात आरसीबीची गोलंदाजी कमकुवत असल्याचं दिसून आलं आहे.
5 / 5
आरसीबी संघ : विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल, लियम लिविंगस्टन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जॉश हेझलवुड, रसिख सलाम, सुयश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वपनिल सिंह, टिम डेविड, नुवन तुषारा, रोमारियो शेफर्ड, जेकब बॅथल, मनोज भंडागे, स्वास्तिक चिकारा, देवदत्त पडिक्कल, मोहित राठी, अभिनंदन सिंह आणि लुंगी एन्गिडी.