IPL 2025 : प्लेऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचणार? वीरेंद्र सेहवागने सांगितली नावं

| Updated on: Mar 22, 2025 | 3:11 PM

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचतील याची उत्सुकता लागून आहे. दहा संघांमध्ये यासाठी 22 मार्चपासून चुरस असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. असं असताना वीरेंद्र सेहवागने प्लेऑफच्या चार संघांबाबत भाकीत वर्तवलं आहे.

1 / 6
आयपीएलच्या 18व्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्याच सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या चार संघांची नावे जाहीर केली आहेत.

2 / 6
मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ यावेळी आणखी मजबूत आहे. त्यामुळे यावेळी मुंबई संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाऊ शकते. सेहवागने असेही म्हटले की ते प्लेऑफमध्ये पोहोचण्याची खात्री आहे.

3 / 6
सनरायझर्स हैदराबाद: गेल्या वेळी अंतिम फेरीत पोहोचलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघात असा कोणताही बदल झालेला नाही. वीरूने भाकीत केले की यावेळीही सनरायझर्स हैदराबाद टॉप 4 मध्ये स्थान मिळवेल. हैदराबादची फलंदाजी लाइनअप जबरदस्त असून जमेची बाजू आहे.

4 / 6
पंजाब किंग्स: पंजाब किंग्सने संतुलित संघ तयार केला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स संघात उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची अपेक्षा करू शकतात.

5 / 6
लखनौ सुपर जायंट्स: लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझी संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ऋषभ पंतने कर्णधार म्हणून संघात प्रवेश केला आहे. संघात बरेच चांगले खेळाडू आहेत. लखनौ सुपरजायंट्स देखील प्लेऑफ खेळेल, अशी शक्यता सेहवागने वर्तवली आहे.

6 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचतील की नाही याबद्दल शंका आहे, असे सेहवागने सांगितले.आता पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ टॉप-4 मध्ये येतील का? सेहवागचे भाकीत खरं ठरेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.