IPL 2025 : पंजाब किंग्सचा कर्णधार कोण? फ्रेंचायझीला घ्यावा लागणार मोठा निर्णय
आयपीएल 2024 स्पर्धेत पंजाब किंग्सची कामगिरी निराशाजनक राहिली. 14 पैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवला आणि नवव्या स्थानावर राहिली. असं असताना शिखर धवनने निवृत्ती घेतल्याने आता पंजाब किंग्सची अडचण वाढली आहे.
1 / 5
शिखर धवन आगामी लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्त खेळाडूंना बीसीसीआयकडून एनओसी घ्यावी लागते. एनओसी मिळाल्यानंतर मिळाल्यास धवन आयपीएलमध्ये खेळू शकत नाही.बीसीसीआयच्या नियमांनुसार आयपीएलमध्ये खेळणारे भारतीय खेळाडू कोणत्याही फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शिखर धवनची आयपीएल कारकीर्द संपली असे म्हणता येईल.
2 / 5
आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जची कामगिरी खूपच खराब झाली. संघाने फक्त पाच सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे संघ यंदा चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे तीन खेळाडूंची नावं सध्या चर्चेत आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत
3 / 5
ऋषभ पंत : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत हा पंजाब किंग्जसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पंत आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच दिल्ली फ्रँचायझीचा भाग आहे. मेगा लिलावापूर्वी पंतला रिलीज केलं जाऊ शकतं. त्यामुळे पंजाब त्याला संघात घेऊ शकते. कर्णधारपदाच्या पर्यायाव्यतिरिक्त पंत हा एक चांगला यष्टिरक्षक फलंदाज देखील आहे.
4 / 5
रोहित शर्मा: भारताचा कर्णधार रोहित शर्माचे नावही या यादीत सामील आहे. रोहित देखील मेगा लिलावाचा एक भाग असू शकतो कारण तो मुंबई इंडियन्ससोबत वेगळे होण्याचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. मुंबई इंडियन्सने त्याच्याकडून कर्णधारपद काढून आधीच हार्दिक पांड्याला दिलं आहे.
5 / 5
केएल राहुल: केएल राहुलने आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले. दुसरीकडे, फ्रँचायझी त्याला रिटेन करण्यास उत्सुक नसल्याचे अहवालात म्हटले आहे. फ्रेंचायझीने केएल राहुलला सोडले तर पंजाब किंग्जचे घेऊ शकते. हा खेळाडू यापूर्वी पंजाबकडून खेळला आहे.