IPL Auction 2024 | आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू
Most Expensive Playes In IPL |
1 / 6
ऑस्ट्रेलियाला भारतात टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मिचेल स्टार्क हा आयपीएल 2024 ऑक्शनमधील सर्वात महागहा खेळाडू ठरला. मिचेलसाठी तब्बल 24 कोटी 50 लाख रुपये मोजले.
2 / 6
तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कॅप्टन पॅट कमिन्स हा आयपीएल 2024 ऑक्शनमधील दुसरा सर्वात महागहा खेळाडू ठरला. पॅटसाठी सनरायजर्स हैदराबादने तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजले. पॅटची 2 कोटी रुपये इतकी बेस प्राईज होती. पॅटच्या निमित्ताने आतापर्यंत महाग ठरलेल्या खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.
3 / 6
इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करन हा 2023 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. सॅमला पंजाब किंग्सने 18 कोटी 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.
4 / 6
ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर उंचपुरा कॅमरुन ग्रीन हा सॅम करननंतर सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने कॅमरुनला 2023 साली 17 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं.
5 / 6
इंग्लंडचा अनुभवी ऑलराउंडर बेन स्टोक्स याला चेन्नई सुपर किंग्सने 2023 मध्ये खरेदी केलं होतं. सीएसकेने स्टोक्ससाठी 16 कोटी 25 लाख रुपये मोजले.
6 / 6
दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर ख्रिस मॉरीस आयपीएल इतिहासातील पाचवा महागडा खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्सने ख्रिससाठी 2021 मध्ये 16 कोटी 25 लाख रुपये खर्चले होते.