आयपीएल लिलावात तसं काही घडलंच नाही! पंजाब किंग्सचं स्पष्टीकरण

| Updated on: Dec 20, 2023 | 10:36 PM

पंजाब किंग्जने मंगळवारी आयपीएल 2024 च्या लिलावात फ्रँचायझीने चुकून खेळाडू खरेदी केल्याचा दावा फेटाळला आहे. दुबईतील कोका कोला एरिना येथे झालेल्या लिलावात पंजाब किंग्जने छत्तीसगडच्या शशांक सिंगला चुकून विकत घेतल्याची बातमी समोर आली होती.

1 / 6
पंजाबने आगामी आयपीएल हंगामासाठी हर्षल पटेल (11.75 कोटी), ख्रिस वोक्स (4.2 कोटी) आणि रिले रूसो (8 कोटी) यांसारखे महागडे खेळाडू विकत घेतले. पण एक खेळाडू खरेदी करताना चूक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली.

2 / 6
लिलावात अष्टपैलू शशांक सिंहला फ्रँचायझीकडून खरेदी करताना चूक झाली, असं सांगण्यात येत आहे.फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली स्पष्टीकरण दिलं आहे.

3 / 6
शशांक दुसऱ्या फेरीत लिलावात आला तेव्हा पंजाब किंग्सने त्याच्यासाठी बोली लावली नाही. कारण त्यांना वाटत होते की तो दुसरा शशांक सिंह आहे. मात्र नंतर कळलं की, तोच शशांक आहे ज्याला विकत घ्यायचे होते.

4 / 6
लिलावादरम्यान दोन खेळाडूंचे नाव एकच असल्याने गैरसमज झाला होता. लिलावातील गैरसमजाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंजाब किंग्जला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले आणि फ्रेंचायझीला स्पष्टीकरण द्यावे लागले.

5 / 6
आयपीएल 2024 च्या लिलावात शशांक सिंगच्या लिलावावरून सुरू झालेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. शशांकने स्वतः सोशल मीडियावर सर्व काही ठीक असल्याचे सांगितले आहे. यासोबतच त्याने फ्रेंचायझीचे आभार मानले आहेत.

6 / 6
आयपीएलमध्ये शशांक सिंह नावाचे दोन प्लेयर्स होते, 32 वर्षीय शशांक अष्टपैलू असून त्याने हैदराबादकडून 2022 मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने 10 सामन्यात 69 धावा केल्या आहेत.  तो आयपीएल 2023 मध्ये अनसोल्ड होता. 32 वर्षीय अष्टपैलू शशांक सिंहची बेस प्राईस 20 लाख रुपये होती आणि पंजाबने त्याला या किंमतीत करारबद्ध केले. दुसरीकडे 19 वर्षीय शशांकने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केलेलं नाही.