IPL Auction 2025 : पहिल्या सेटमध्ये लागली 110 कोटी रुपयांची बोली, कोणी किती भाव खाल्ला? जाणून घ्या
आयपीएल लिलावात पहिल्या सेटमध्ये मॉर्की प्लेयर्ससाठी बोली लागली. या सेटमध्ये एकूण सहा खेळाडू होते. या सहा खेळाडूंसाठी 110 कोटी रुपयांची बोली लागली. यात दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलेला ऋषभ पंत सर्वात जास्त भाव खाऊन गेला.
1 / 7
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडत आहे. यात दहाही फ्रेंचायझी आपला संघ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पहिल्या सेटवर लागून होत्या. यात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, जॉस बटलर, मिचेल स्टार्क आणि कगिसो रबाडा हे दिग्गज प्लेयर्स होते.
2 / 7
आयपीएल बोलीची सुरुवात अर्शदीप सिंगपासून झाली. अर्शदीप सिंगला पंजाब किंग्सने रिलीज केलं होतं. त्यामुळे त्याला परत घेणार नाही असंच वाटत होतं. पण पंजाब किंग्सच्या मनात काहीतरी वेगळंच सुरु होतं. त्याच्यासाठी 18 कोटी रुपयांचं आरटीएम कार्ड वापरलं आणि संघात घेतलं.
3 / 7
अर्शदीप सिंगनंतर कगिसो रबाडावर बोली लागली. कगिसो रबाडासाठी गुजरात टायटन्सने 10.75 कोटी मोजले. पण ही बोली लागल्यानंतर पंजाब किंग्स पुन्हा एकदा आरटीएम कार्डसाठी विचारणा करण्यात आली. पण त्याने आरटीएम कार्ड वापरण्यास नकार दिला आणि रबाडा गुजरातकडे गेला.
4 / 7
तिसरं नाव या यादीत श्रेयस अय्यरचं आलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने मागच्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी पंजाब आणि दिल्लीत रस्सीखेच सुरु होती. पण पंजाबने 26.75 कोटी मोजून संघात घेतलं.
5 / 7
कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलेल्या मिचेल स्टार्कची जोरदार चर्चा रंगली होती. या लिलावात त्याला किती भाव मिळतो याकडे लक्ष होतं. मिचेल स्टार्कने 2023 मिनी लिलावात 24.75 कोटींचा भाव खाल्ला होता. पण यावेळी दिल्लीने त्याला 11.75 कोटी रुपये देऊन घेतलं. कोलकात्याने आरटीएम कार्डही वापरलं नाही.
6 / 7
राजस्थान रॉयल्सने जॉस बटलरला रिलीज केलं होतं. कारण सहा खेळाडू रिटेन केल्यानंतर त्यांच्याकडे पर्यायही नव्हता. त्यामुळे त्याच्यासाठी मोठे पैसे मोजणं कठीण होतं. अखेर गुजरात टायटन्सने 15.75 कोटी खर्च करून त्याला आपल्या संघात घेतलं.
7 / 7
मॉर्की प्लेयर्सच्या पहिल्या सेटमध्ये सर्वात शेवटचं नाव ऋषभ पंतच आलं. या नावाची सर्वात चर्चा होती. किती कोटी मिळणार याबाबत आधीच अंदाज बांधले जात होते. इतकंच काय तर ऋषभ पंतसाठी दिल्लीने आरटीएम कार्डही वापरलं. पण लखनौ सुपर जायंट्सने लावलेली 27 कोटींची बोली पाहून त्यांनीही काढता पाय घेतला.