IPL Auction : वेंकटेश अय्यरला घेताना कोलकाता नाईट रायडर्सचा निघाला दम, झालं असं की..
आयपीएल इतिहासात कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आयपीएल 2024 जेतेपदावर नाव कोरल्यानंतर लिलावात कोणत्या प्लेयरवर डाव लावणार याबाबत उत्सुकता होती. कोलकात्याने आपल्याच वेंकटेश अय्यरासाठी 23 कोटी 75 लाखांची बोली लावली. मेगा लिलावातील तिसरा महागडा खेळाडू ठरला आहे.
1 / 5
आयपीएल मेगा लिलावात कोट्यवधी रुपयांची बोली लागल्याचं पाहायला मिळालं. ऋषभ पंत आयपीएल मेगा लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी 27 कोटी मोजले गेले. तर श्रेयस अय्यरला 26 कोटी 75 लाख मोजले गेले. यानंतर तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला तो वेंकटेश अय्यर..
2 / 5
कोलकाता नाईट रायडर्सने आधीच सहा खेळाडू रिटेन केले होते. त्यामुळे आरटीएमचं ऑप्शन उरलं नव्हतं. त्यामुळे आपलाच खेळाडू संघात घेण्यासाठी चांगलाच दम निघाला. वेंकटेश अय्यरसाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागले. वेंकटेश अय्यर कोलकात्यातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
3 / 5
वेंकटेश अय्यरसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. पण कोलकात्याने त्याला संघात घेण्यासाठी सर्वस्वी पणाला लावल्याचं पाहायला मिळालं. कोलकात्याने त्याच्यासाठी 23.75 कोटी रुपये मोजले.
4 / 5
ग्लेन मॅक्सवेल , मार्कस स्टॉइनिस, रचिन रवींद्र, हर्षल पटेल, मिचेल मार्श, रविचंद्रन अश्विन आणि व्यंकटेश अय्यर यांना चौथ्या सेटमध्ये ठेवण्यात आले होते. मॅक्सवेलला 4.20 कोटी आणि मार्कस स्टॉइनिसला 11 कोटी देत पंजाबने घेतलं. हैदराबादने हर्षल पटेलसाठी 8 कोटी मोजले. मिचेल मार्शसाठी लखनौने 3 कोटी 40 लाख मोजले. आर अश्विनसाठी चेन्नईने 9 कोटी 75 लाख मोजले.
5 / 5
कोलकाता नाईट रायडर्सने लिलावाआधी सहा खेळाडू रिटेन केले होते. रिंकु सिंहला 13 कोटी, वरुण चक्रवर्थीला 12 कोटी, सुनील नरीनला 12 कोटी, आंद्रे रसेला 12 कोटी, हार्षित राणाला 4 कोटी, रमनदीप सिंगला 4 कोटी रुपये दिले आहेत. 57 कोटी खर्च केले होते आणि 63 कोटी शिल्लक होते.