Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे टॉप 5 सिक्सर किंग, नंबर 1 कोण?
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एकसेएक तोडीसतोड आणि विस्फोटक फलंदाज आहेत. ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा यासारखे फलंदाज आहेत. मात्र मुंबईकडून सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? जाणून घ्या.
1 / 5
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड माजी विस्फोटक फलंदाज किरॉन पोलार्ड याच्या नावावर आहे. पोलार्डने मुंबईसाठी 189 सामन्यांमध्य 223 सिक्स ठोकले आहेत.
2 / 5
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. रोहितने मुंबईसाठी आतापर्यंत 216 सिक्स ठोकले आहेत.
3 / 5
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या तिसऱ्या स्थानी आहे. हार्दिकने पलटणसाठी 94 सामन्यांमध्ये 104 सिक्स लगावले आहेत.
4 / 5
मुंबईचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने 80 मॅचेसमध्ये 103 सिक्स खेचले आहेत. ईशान किशन चौथ्या स्थानी आहे.
5 / 5
'मिस्टर 360' अर्थात सूर्यकुमार यादव मुंबईसाठी आतापर्यंत 87 सामने खेळला आहे.सूर्याने या 87 सामन्यांमध्ये 95 सिक्स ठोकले आहेत.