IPL Qualifier 1 CSK vs GT : क्वॉलिफायर सामन्यापूर्वी शुभमन गिलचा तो फोटो व्हायरल, चाहते म्हणाले…
गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल भलताच फॉर्मात आहे. दोन शतकी खेळी आणि अर्धशतकांच्या जोरावर त्याने 68 धावा केल्या आहेत. आता त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
1 / 6
गुजरात टायटन्सने आयपीएल प्लेऑफमध्ये एंट्री मारली आहे. या स्पर्धेत शुभमन गिल चांगलाच फॉर्मात आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo : IPL/BCCI)
2 / 6
आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. हा सामना 23 मे रोजी चेन्नईत खेळला जाणार आहे. (Photo : IPL/BCCI)
3 / 6
या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल वेगळ्याच अंदाजात दिसला. त्याने चाहत्यांना सिक्स पॅक अॅब्स दाखवले. (Photo : IPL/BCCI)
4 / 6
शुभमन गिलने टॉवेलमध्ये शर्टलेस फोटो शेअर केला आहे. सावरिया चित्रपटातील रणवीर कपूरसारखा लूक असल्याचं चाहत्यांनी सांगितलं. (Photo : Instagram)
5 / 6
शुभमन गिलने हा फोटो स्वत:च्या मोबाईलने काढला आहे. फोटोला थर्स्ट trap असं कॅप्शन दिलं आहे. (Photo : Instagram)
6 / 6
शुभमन गिल आयपीएल स्पर्धेत 14 सामने खेळला असून 680 धावा केल्या आहेेS यात दोन शतकांचा समावेश आहे. (Photo : IPL/BCCI)