Rinku Singh | हाय आपलीच हवा! आयर्लंडला पोहचताच रिंकू सिंह चर्चेत
India Tour Of Ireland 2023 | टीम इंडिया जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. रिंकू सिंह याचा हा पहिलाच दौरा आहे.
1 / 5
टीम इंडिया आयर्लंडमध्ये पोहचली आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीायने टीम इंडियाचे फोटो शेअर केले आहेत.
2 / 5
आयर्लंड विरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियाकडून अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. बुमराह दुखापतीनंतर थेट आयर्लंड विरुद्ध कमबॅक केलं आहे.
3 / 5
टीम इंडियाचा युवा फलंदाज रिंकू सिंह आयर्लंडला पोहचताच त्याच्या कपड्यांमुळे चर्चेत आला आहे. फोटोत टीम इंडियाचे सर्व खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफ हे पूल ओव्हर्स घातलेलं आहे. मात्र रिंकू एकटाच टीशर्ट आणि शॉर्ट्सवर दिसत आहे. आयर्लंडमध्ये वातावरण थंड आहे. त्यात टीमपेक्षा वेगळे कपडे घातल्याने तो चर्चेत आला आहे.
4 / 5
रिंकू सिंह याने आयपीएल 16 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना उल्लेखनीय कामिगिरी केली. त्याच जोरावर रिंकूची टीम इंडियात आयर्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. रिंकूला चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठीही संधी देण्यात आली आहे.
5 / 5
टीम इंडियासाठी आयर्लंड विरुद्धची टी 20 मालिका फार महत्वाची आहे. या मालिकेतून जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत अंदाज येईल. तसेच युवा खेळाडूंच्या कामगिरीकडेही निवड समितीचं लक्ष असेल.