आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 सीरिजला 18 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडियाकडून चौघांना पदार्पणाची संधी मिळू शकते.
रिंकू सिंह याचा टीम इंडियासोबतची ही पहिलीच मालिका आहे. रिंकूने आयपीएल 16 व्या मोसमात आपल्या बॅटिंगने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. रिंकूला त्याच कामगिरीमुळे टीम इंडियात संधी मिळाली. आता रिंकू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
प्रसिद्ध कृष्णा याने दुखापतीनंतर अनेक महिन्यांनी टीममध्ये कमबॅक केलंय. प्रसिद्धने वनडेत टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. मात्र प्रसिद्धला आता आयर्लंड दौऱ्यात टी 20 डेब्यू करण्याची संधी मिळू शकते.
अमरावतीच्या जितेश शर्मा याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. जितेशची श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत निवड झाली होती. मात्र जितेशला दोन्ही मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे जितेशला आयर्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये डेब्यूची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत ऑलराउंडर शहबाज अहमद याला संधी मिळू शकते. शहबाजला गेल्या वर्षी वनडेत खेळण्याची संधी मिळाली. मात्र अजून टी 20 डेब्यूचा योग आलेला नाही.