Ishan Kishan : इशान किशन याने महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाशी केली बरोबरी, काय केलं ते जाणून घ्या
IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इशान किशन याने खास विक्रमाची नोंद केली आहे. तिसऱ्या वनडेत अर्धशतक झळकावताच महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
1 / 6
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात रंगलेल्या तिसऱ्या निर्णायक सामन्यात इशान किशन याने अर्धशतक झळकावलं. या अर्धशतकासह त्याने महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
2 / 6
तिसऱ्या सामन्यात सलामीला आलेल्या इशान किशन याने 64 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. यासह त्याने तीन सामन्यांच्या मालिकेत सलग अर्धशतकं झळकावणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे.
3 / 6
मालिकेत सलग अर्धशतकं झळकावणारा दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर होता.
4 / 6
महेंद्रसिंह धोनी याने 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत अर्धशतकांनी हॅटट्रीक केली होती. आता इशान किशन याने वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली आहे.
5 / 6
इशान किशन याने पहिल्या वनडेत 52 आणि दुसऱ्या वनडेत 55 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात 77 धावा करताच त्याने अर्धशतकांची हॅटट्रीक केली.
6 / 6
ख्रिस श्रीकांत (1982), दिलीप वेंगसरकर (1985), मोहम्मद अझरुद्दीन (1993), एमएस धोनी (2019), श्रेयस अय्यर (2020) यांनी मालिकेत अर्धशतकांची हॅटट्रीक केली आहे. इशान किशन सहावा खेळाडू ठरला आहे.