इशान किशन आयपीएल 2025 मध्ये या फ्रेंचायझीकडून खेळणार! लिलावापूर्वीच दिली हिंट
आयपीएल मेगा लिलाव 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. दहा फ्रेंचायझींनी आपली रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. तर उर्वरित खेळाडू मेगा लिलावात दिसणार आहे. लिलाव प्रक्रिया 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहे. इशान किशनही मेगा लिलावात असणार आहे. त्याच्याबाबत एक बातमी समोर आली आहे.
1 / 6
आयपीएल मेगा लिलावासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. फ्रेंचायझींनी आवश्यक असलेल्या खेळाडूंना रिटेन केलं असून बाकीच्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. त्यामुळे मेगा लिलावात रिलीज केलेल्या खेळाडूंसाठी मोठी बोली लावावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सने पाच खेळाडू रिटेन केले असून बाकी खेळाडूंनी सोडलं आहे.
2 / 6
मुंबई इंडियन्सने स्टार विकेटकीपर फलंदाज इशान किशनला रिलीज केलं आहे. त्यामुळे इशान किशनवर इतर फ्रेंचायझींचा नजरा आहेत. इशान किशनची आक्रमक शैली आणि विकेटकीपिंग पाहता त्याला संघात घेण्यासाठी रस्सीखेच होणार यात शंका नाही.
3 / 6
इशान किशनबाबत गुजरात टायटन्सने एक हिंट दिली आहे. त्यामुळे इशानला घेण्यासाठी गुजरात टायटन्स मोठी बोली लावणार असंच दिसत आहे. गुजरात टायटन्सने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात किशन आणि गिल एकत्र सराव करताना जात असल्याचं दिसत आहे.
4 / 6
गुजरात टायटन्सने हा व्हिडीओ 9 नोव्हेंबरला शेअर केला आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे. पण या व्हिडीओतून एक प्रकारे हिंट दिल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना गुजरात टायटन्सने लिहिलं आहे की, 'जिंदगी एक सफर है सुहाना, यहां कल क्या हो किसने जाना?'
5 / 6
शुबमन गिल हा गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. इशान किशन आणि गिलची मैत्री सर्वश्रूत आहे. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे, शुबमन गिलने राशिद खानला संघात थांबवण्यासाठी स्वत:चं वेतन कमी केलं. त्यामुळे त्याच्या या निर्णयाचं कौतुक झालं होतं.
6 / 6
गुजरात टायटन्सने पाच खेळाडूंना रिटेन केलं आहे. यात राशीद खानला 18 कोटी, शुबमन गिलला 16.50 कोटी, साई सुदर्शनला 8.50 कोटी, राहुल तेवतियाला 4 कोटी आणि शाहरुख खानला 4 कोटी रुपये दिले आहेत. गुजरातने एकूण 52 कोटी खर्च केलं असून 68 कोटी शिल्लक आहेत. (Photo- गुजरात टायटन्स)