आयपीएलमधले हे पाच विक्रम मोडणं खूपच कठीण! जाणून घ्या कोणी काय केलं ते
आयपीएल 2024 स्पर्धेचा थरार आता पुढचे दोन महिने अनुभवायला मिळणार आहे. चौकार षटकारांच्या वर्षावांनी चांगलंच मनोरंजन होणार आहे. तसेच नव्या विक्रमांना गवसणी घातली जाणार आहे. असताना आयपीएलमध्ये काही विक्रम असे आहेत की मोडणं खूपच कठीण आहे. चला जाणून घेऊयात या विक्रमांबाबत
1 / 6
आयपीएल स्पर्धेत काही भीमपराक्रम रचले गेले आहेत. विक्रम मोडण्यासाठी नशिबाची साथ लागणार आहे. कारण या विक्रमांचा आकडा पाहीला तर कदाचित मोडणंही कठीण आहे असंच समजायला हवं. मागच्या पर्वात विक्रम काही मोडता आले नाहीत. चला जाणून घेऊयात याबाबत
2 / 6
आयपीएल 2013 मध्ये ख्रिस गेलचा झंझावात पाहायला मिळाला. पुणे वॉरियर्सविरोधात षटकार आणि चौकारांचा वर्षाव केला. 66 चेंडूत नाबाद 175 धावांची खेली केली. यात गेलने 13 चौकार आणि 17 षटकार मारले.
3 / 6
4 / 6
एमएस धोनीच्या नावावर कर्णधार म्हणून सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम आहे. धोनीने 226 सामने खेळले आहेत. 2008 पासून धोनी चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करत आहे.
5 / 6
आरसीबीकडून खेळणाऱ्या विराट कोहलीने 2016 मध्ये कहर केला होता. 16 सामन्यांमध्ये 973 धावा केल्या होत्या. यात 4 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता. 973 ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
6 / 6
आरसीबीची विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स ही जोडी सर्वोत्तम ठरली आहे. या जोडीने 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध 229 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. यात विराट कोहलीने 55 चेंडूत 109 आणि एबी डिव्हिलियर्सने 52 चेंडूत नाबाद 129 धावा केल्या होत्या.