Indian Cricket Team | टी 20 सीरिजमधून 5 खेळाडूंची सुट्टी! कोण आहे ते?
India vs Afghanistan T20 Series | बीसीसीआयने रविवारी 7 जानेवारीला अफगाणिस्तान विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या टीममध्ये 5 असे खेळाडू नाहीत, जे निर्णायक भूमिका बजावण्याची क्षमता ठेवतात. पाहा कोण आहेत ते?
1 / 5
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना टीम इंडियात संधी दिली आहे. दोघेनी नोव्हेंबर 2022 नंतर टी 20 टीममध्ये परतले आहेत.
2 / 5
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी धमाकेदार बॉलिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना गुंडाळलं. मात्र अफगाणिस्तान विरुद्ध या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.
3 / 5
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याने दक्षिण आफ्रिके विरुद्ध पहिल्या कसोटीत शतक ठोकलं. मात्र केएललाही अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 सीरिजसाठी समावेश करण्यात आलेला नाही. टीम इंडियात विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांना स्थान देण्यात आलंय.
4 / 5
अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिकेत श्रेयस अय्यर हा देखील खेळताना दिसणार नाही. श्रेयसला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी संधी देण्यात आली. मात्र श्रेयसने निराशा केली.
5 / 5
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याचाही अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी समावेश करण्यात आलेला नाही. जडेजा दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये होता. दुसरा सामना तो खेळला. मात्र त्याला पहिल्या सामन्याला पाठीच्या दुखापतीमुळे खेळता आलं नाही.