अँडरसन निवृत्तीनंतर वयाच्या 42 व्या वर्षी पुनरागमन करण्यास सज्ज

| Updated on: Jan 14, 2025 | 10:44 PM

जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली. अँडरसन कसोटी कारकिर्दीत 40,000 पेक्षा जास्त चेंडू टाकणारा तो जगातील एकमेव वेगवान गोलंदाज ठरला आहे. अँडरसनने निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या नावावरील विक्रम आणखी काही वर्षे कायम असतील यात शंका नाही.

1 / 5
जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून 7 महिने पूर्ण झाले आहेत. या निरोपानंतर त्याने इंग्लंड संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग सुरू केली. पण अँडरसन इथेच थांबला नाही वयाच्या 42 व्या वर्षी तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यास तयार आहे.

2 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा जेम्स अँडरसन आगामी काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहे. यासाठी त्याने लँकेशायर संघासोबत एक वर्षाचा करारही केला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसणार आहे.

3 / 5
करारानुसार जेम्स अँडरसन आगामी काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे. तसेच, व्हिटॅलिटी टी20 ब्लास्ट स्पर्धेत लँकेशायरकडून खेळणार आहे. यासह जेम्स एडरसनने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

4 / 5
जेम्स अँडरसनने 2001 मध्ये लँकेशायरकडून फर्स्ट क्लास खेळून कारकिर्दीची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी याच संघाकडून तो शेवटचा प्रथम श्रेणी सामनाही खेळला होता. यावेळी त्याने नॉटिंगहॅमशायरविरुद्ध 35 धावांत 7 बळी घेत शानदार कामगिरी केली होती.

5 / 5
जेम्स अँडरसनने इंग्लंडसाठी 188 कसोटीत एकूण 40037 चेंडू टाकले आहेत. यावेळी त्याने 18627 धावा देत एकूण 704 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज होण्याचा विश्वविक्रम रचला आहे.