डे नाईट कसोटी सामन्यापूर्वीच जसप्रीत बुमराहला मिळाली आनंदाची बातमी, झालं असं की…

| Updated on: Dec 05, 2024 | 6:39 PM

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्या कसोटीत जबरदस्त कामगिरी केली आणि विजय मिळवला. त्यामुळे बुमराहच्या कर्णधारपदाचं सर्वत्र कौतुक झालं. पण आता रोहित शर्मा परतल्याने धुरा त्याच्याकडे सोपवली आहे. असं असताना जसप्रीत बुमराहला एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये सुरू होणार आहे. या सामन्याआधी आयसीसीने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एक आनंदाची बातमी दिली आहे. बुमराहला नोव्हेंबरच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

2 / 5
बुमराहने पहिल्या कसोटीत कर्णधार आणि गोलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केली. या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेत संघाला 295 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. आयसीसीने त्याच्या कामगिरीची दखल घेत विशेष पुरस्कारासाठी नामांकित केले आहे.यापूर्वी त्याने या वर्षी जूनमध्ये हा पुरस्कार जिंकला होता.

3 / 5
एका वर्षात दोन आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार घेण्याचा मान शुबमन गिलला मिळाला आहे. आता जसप्रीत बुमराहला पुरस्कार मिळाल्यास त्याच्या विक्रमाशी बरोबरी करेलं.

4 / 5
जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत पहिल्या डावात 30 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. यामुळे भारताला 46 धावांची आघाडी मिळाली. यानंतर त्याने दुसऱ्या डावात 42 धावांत 3 बळी घेतले होते. त्याच्या कामगिरीची दखल आयसीसीने प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी घेतली आहे.

5 / 5
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त आयसीसीने मार्को जॅन्सन आणि हॅरिस रौफ यांना या पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाकिस्तानच्या ऐतिहासिक वनडे मालिका विजयात हॅरिस रौफचा मोलाचा वाटा होता. टी-20 मालिकेतही त्याने आपला फॉर्म कायम ठेवला. हॅरिस रौफही हा पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत आहे.