जसप्रीत बुमराहचा आयसीसी क्रमवारीत मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज

| Updated on: Dec 25, 2024 | 7:35 PM

भारताच्या क्रिकेट संघाला जसप्रीत बुमराह नावाचं धारदार अस्त्र सापडलं आहे. त्याच्या इतकं प्रभावी गोलंदाज आतापर्यंत टीम इंडियाला लाभलेलं नाही. गोलंदाज आले पण सातत्यपूर्ण कामगिरी करणं कठीण दिसलं. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतही त्याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली.

1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये होत आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने जसप्रीत बुमराहची चांगलीच धास्ती घेतली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतही त्याने प्रभावी गोलंदाजी केली.

2 / 5
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याचा सामना करताना चांगलीच धडपड करताना दिसत आहे. आता जसप्रीत बुमराहने चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी एक मैलाचा दगड गाठला आहे.

3 / 5
आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याचं पहिलं स्थान कायम आहे. या स्थानावर कायम असताना त्याचे गुण 904 झाले आहेत.

4 / 5
जसप्रीत बुमराह हा 904 गुण मिळवणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी आर अश्विनने केली होती. तसेच अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. बुमराहचा फॉर्म पाहता चौथ्या कसोटीनंतर यात आणखी वाढ होऊ शकते.

5 / 5
 क्रमवारीत जसप्रीत बुमराह खुपच पुढे गेला आहे. त्याच्या आसपास सध्या कोणी नाही. कागिसो रबाडाचे 856, जोश हेझलवूडचे 852, पॅट कमिन्सचे 822 आणि आर अश्विनचे 789 गुण आहेत. दरम्यान, इंग्लंडचा सिडनी बार्न्स हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकगुण मिळवणारा खेळाडू ठरला आहे. 1914 मध्ये त्यांनी 932 रेटिंग गुण मिळवले होते.