भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर याचा प्रभाव पडणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर..कारण बेझबॉलची दाणादाण बूमबॉलने उडवून दिली आहे.
पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने जबरदस्त कमबॅक केलं. एकट्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडचं कंबरडं मोडलं. दोन डावात एकूण 9 गडी बाद केले. तसेच विजयाचा खरा शिल्पकार ठरला.
तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या मनात जसप्रीत बुमराहची भीती बसली आहे. त्यात बुमराह एक खास विक्रम रचण्याच्या वेशीवर आहे. म्हैसूर एक्स्प्रेसने नावाने प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत काढणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक पाचवेळा गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानी आहे. जवागल श्रीनाथने पाच गडी बाद करण्याची किमया 13 वेळा साधली आहे.
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 12 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेताच एक जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी साधणार आहे. अशी कामगिरी करणार टीम इंडियाचा दुसरा गोलंदाज ठरेल.
कपिल देव हा टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा पाच गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आहे. कपिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 बळी घेतले आहेत. कपिल देवने 24 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.