बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी! मोठ्या पदासाठी काढली जाहिरात; जाणून घ्या पात्रता
बीसीसीआयचं मुख्य निवड समिती अध्यक्षपद गेल्या काही दिवसांपासून रिक्तच आहे. चेतन शर्मा स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून बीसीसीआयला या पदासाठी योग्य व्यक्ती मिळालेला नाही.
1 / 5
चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपद रिक्तच आहे. या पदासाठी आता योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी बीसीसीआयची धडपड सुरु आहे. या पदासाठी बीसीसीआयने पात्रता जाहीर केली आहे. चला जाणून घेऊयात याबाबत (BCCI)
2 / 5
मुख्य निवड समिती अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यापूर्वी काही अटी माहिती असणं आवश्यक आहे. अर्जदाराकडे कमीत कमी सात कसोटी सामने खेळल्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. (BCCI)
3 / 5
सात कसोटी सामने खेळला नसेल तर कमीत कमी 30 फर्स्ट क्लास सामने किंवा 10 वनडे इंटरनॅशनल आणि 20 फर्स्ट क्लास सामन्यांचा अनुभव असणं गरजेचं आहे. (BCCI)
4 / 5
पदासाठी अर्ज करण्यासाठी माजी खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्त होऊन कमीत कमी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले असावा. त्याचबरोबर सदर अर्जदार गेल्या पाच वर्षात कोणत्याही क्रिकेट कमिटीचा सदस्य नसावा. (BCCI)
5 / 5
चेतन शर्मा यांनी मुख्य निवड समिती अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पद रिक्त असून शिवसुंदर दास सध्या हा कार्यभार सांभाळत आहेत. (BCCI)