IND vs ENG | टीम इंडिया तिसऱ्या कसोटीत या तिघांशिवाय मैदानात उतरणार, कोण आहेत ते?
India vs England 3rd Test | इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचे 3 खेळाडू हे खेळणार नाहीत.
1 / 5
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा घेतला. टीम इंडियाने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.
2 / 5
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना 15 ते 19 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचे तिघे खेळणार नाहीत.
3 / 5
विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या 3 सामन्यातूनही बाहेर पडला आहे. विराट पहिल्या 2 सामन्यातही खेळला नव्हता. विराट न खेळण्यामागचं अचूक कारण अजूनही स्पष्ट नाही.
4 / 5
श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे उर्वरित मालिकेत खेळणार नाही. श्रेयसला गेल्या काही महिन्यांपासून अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेही श्रेयसला बाहेर केल्याचं म्हटलं जात आहे.
5 / 5
केएल राहुल याची इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 3 सामन्यांसाठी निवड करण्यात आली होती, मात्र त्याला फिटनेस टेस्ट बंधनकारक होती. पण 2 दिवसांनी केएल राहुल तिसऱ्या कसोटीतून बाहेर झाल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं. त्याच्या जागी टीममध्ये देवदत्त पडीक्कल याला संधी देण्यात आली आहे.