IPL 2023 | कॅप्टन स्पर्धेतून ‘आऊट’, आता मोठा खेळाडू दुखापतीच्या कचाट्यात, टीमचं टेन्शन वाढलं
आयपीएलच्या 16 व्या मोसमाला 7 दिवस बाकी आहेत. याआधी कॅप्टन दुखापतीमुळे बाहेर पडलाय. त्यात आता एक अनुभवी आणि वेगवान गोलंदाजाला दुखापत झालीय. त्यामुळे या खेळाडूवर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.
1 / 5
आयपीएल 16 व्या मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बरेच खेळाडू हे दुखापतीच्या कचाट्यात अडकले आहेत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आघाडीवर आहे. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यानंतर केकेआरचं टेन्शन वाढलं असताना त्यात आता आणखी भर पडली आहे. केकेआरचा एक स्टार आणि अनुभवी गोलंदाजाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
2 / 5
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याला दुखापत झाली आहे. हेमस्ट्रिंग दुखापतीमुळे लॉकी याला श्रीलंका विरुद्धच्या वनडे सीरिजमधील सामन्यात खेळता येणार नाहीये. या मालिकेला 25 मार्चपासून सुरुवात होत आहे.
3 / 5
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आज 23 मार्च रोजी फर्ग्युसन याला दुखापत झाल्याची माहिती दिली. सरावादरम्यान फर्ग्युसन याची फिटनेस टेस्ट करण्यात आली. यामध्ये तो अपयशी ठरला. त्यामुळे फर्ग्युसन मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर झालाय.
4 / 5
फर्ग्युसन या सीरिजमधील पहिल्या सामन्यात खेळणार होता. त्यानंतर तो टीममधील काही सहकाऱ्यांसोबत भारतात आयपीएलसाठी येणार होता. मात्र त्याआधीच ही दुखापत झाली आहे. आता प्रश्न असाय की लॉकी आयपीएल सुरु होण्याआधी बरा होणार की नाही. केकेआर या मोसमातील आपला पहिला सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध 1 एप्रिल रोजी खेळणार आहे.
5 / 5
लॉकी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आयपीएलमध्ये खेळतोय. लॉकी आयपीएलच्या 15 व्या मोसमात गुजरात टायटन्स कडून खेळत होता. त्यानंतर लॉकीला गुजरातने ट्रे़ड करत केकेआरच्या टीममध्ये पाठवलं. गुजरातकडून खेळण्याआधी लॉकी हा कोलकाता टीमचा सदस्य होता.