IPL 2024 : 24.75 कोटी खर्च करून घेतलेल्या मिचेल स्टार्कने ठोकलं नकोसं शतक! वाचा काय केलं ते

| Updated on: Mar 30, 2024 | 5:28 PM

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बोली लावून कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आपल्या ताफ्यात घेतलं. आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू कोलकात्यासाठी खऱ्या अर्थाने महाग ठरला. मिचेल स्टार्कने नकोसं शतक आपल्या नावावर केलं आहे.

1 / 6
आयपीएल स्पर्धेत रोज होणाऱ्या सामन्यानंतर गुणतालिकेत फरक दिसून येत आहे. कोलकात्याने स्पर्धेत चांगली सुरुवात केली असून सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात हैदराबादला 4 धावांनी, दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला.

2 / 6
कोलकात्याची स्पर्धेतील कामगिरी चांगली होत असताना गौतम गंभीरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं होत आहे. त्याचं कारण ठरतोय तो ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क..मिनी लिलावात त्याच्यासाठी कोलकात्याने 24.75 कोटींची बोली लावली होती.

3 / 6
मिचेल स्टार्क हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. पण आता कोलकात्यासाठीही महागडा ठरत आहे. दोन सामन्यात याची प्रचिती आली. त्याने दोन सामन्यांमध्ये 100 धावा दिल्या.

4 / 6
मिचेल स्टार्ककडून कोलकाता नाईट रायडर्सला बऱ्याच अपेक्षा आहेत. कोलकात्याच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा असेल अशी आशा आहे. पण पहिल्या दोन सामन्यात मिचेल स्टार्क पूर्णपणे फेल ठरला.

5 / 6
हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही स्टार्कने 4 षटकात 53 धावा दिल्या होत्या. या सामन्यात तो सर्वात महागडा खेळाडू तर ठरलाच पण एकही विकेट घेता आली नाही.

6 / 6
बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातही स्टार्कने 4 षटकात 47 धावा दिल्या. या सामन्यातही स्टार्कला एकही विकेट घेता आली नाही. स्टार्कने आतापर्यंत 8 षटके टाकली असून एकही विकेट न घेता 100 धावा दिल्या आहेत.