भारत इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये सुरु आहे. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात केएल राहुलच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.
केएल राहुल भारतासाठी 50 कसोटी सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी करणारा भारताचा 37 वा खेळाडू ठरला आहे.
केएल राहुलने 84 कसोटी डावात एकूण 2755 धावा केल्या आहेत. यात 8 शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. आता 50 व्या कसोटी सामन्यात केएल राहुल कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.
केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विकेटकीपरच्या भूमिकेत नाही. तो फक्त फलंदाज म्हणून दिसणार आहे. केएस भरत पहिल्या सामन्यात विकेटकीपिंग करत आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारतासाठी सर्वाधिक कसोटी खेळणारा फलंदाज आहे. सचिनने 200 कसोटी सामने खेळले असून एकूण 15921 धावा केल्या आहेत. तर 51 शतकं झळकावली आहेत.
इंडिया प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशवी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज.