IND vs ENG : कुलदीप यादवला एका विकेटसाठी बीसीसीआय देणार 1 लाख रुपये! का ते जाणून घ्या
कुलदीप यादवने पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची दाणादाण उडवली. कुलदीप यादवने एकट्याने निम्मा संघ तंबूत पाठवला. कुलदीप यादवने 15 षटकात 72 धावा देत 5 गडी बाद केले. या विकेट्समुळे कुलदीप यादवला लॉटरी लागली आहे. आता त्याला प्रत्येक विकेटसाठी एक लाख रुपये मिळणार आहेत. का आणि कशासाठी ते समजून घ्या.
1 / 6
भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना धर्मशाळा येथे सुरु आहे. पहिल्या दोन दिवसातच भारताने या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. तसेच इंग्लंडने केलेल्या 218 धावांचा पल्ला गाठून पुढे निघाला आहे. त्यामुळे इंग्लंडपुढे मोठं आव्हान उभ राहील यात शंका नाही. या सामन्यात इंग्लंडची हवा गूल करण्यात खरा हात कुलदीप यादवचा होता.
2 / 6
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इंग्लंडने फलंदाजी स्वीकारली. त्यांनी अश्विनचा बराच अभ्यास केला होता. पण परीक्षेला कुलदीप यादवचा पेपर आला आणि सर्वस्व गमवण्याची वेळ आली. कुलदीप यादवने झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांना माघारी पाठवलं.
3 / 6
पाच विकेटसह कुलदीप यादवने कसोटी कारकिर्दीतने 50 बळी पूर्ण करत इतिहास रचला. सर्वात जलद 50 गडी बाद करण्याचा विक्रम त्यांना नावावर झाला आहे. कुलदीपने 1871 चेंडूत 50 गडी बाद केले.
4 / 6
कुलदीप यादवने आपल्या कामगिरीने सर्वांना मोहित केलं आहे. इंग्लंडला 218 धावांवर समाधान मानावं लागलं. त्यात डाव पहिल्याच दिवशी संपल्याने या सामन्याचा निकाल लागणार हे देखील स्पष्ट झालं आहे. असं सर्व असताना कुलदीपला बीसीसीआयकडून एक खास गिफ्ट मिळालं आहे.
5 / 6
कसोटीच्या पहिल्या डावात घेतलेल्या प्रत्येक विकेटसाठी कुलदीप यादवला बीसीसीआयकडून प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार आहेत. मग हा नियम फक्त कुलदीपला लागू आहे का? तर तसं नाही. कुलदीपला पैसे मिळण्याचं खास कारण आहे.
6 / 6
जेव्हा एखादा खेळाडू एका डावात 5 गडी बाद करतो तेव्हा मॅच फीमध्ये 5 लाख रुपये अतिरिक्त मिळतात. बीसीसीआयकडून हा बोनस दिला जातो. अर्थात कुलदीपला एका विकेटसाठी 1 लाख रुपये मिळतील असं एक गणित आहे.