श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत इरफान पठाणचा विक्रम कुलदीप यादवच्या रडारवर, असं करताच टॉप 10 मध्ये एन्ट्री
भारत श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या मालिकेत कुलदीप यादव संघाचा भाग आहे. कुलदीप यादवने मागच्या काही वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे या मालिकेतही त्याच्याकडून तशाच अपेक्षा आहेत. असं असताना एक विक्रम कुलदीप यादवच्या रडारवर आहे.
1 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 ऑगस्टला पहिला वनडे सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात कुलदीप यादवची प्लेइंग इलेव्हनमध्ये वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे. कारण श्रीलंकेतील खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी आहे.
2 / 5
कुलदीप यादवची वर्णी पहिल्या वनडे सामन्यात लागली तर एक विक्रम त्याच्या दृष्टीक्षेपात असणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये इरफान पठाणला मागे टाकण्याची त्याच्याकडे संधी आहे. तसेच टॉपमध्ये स्थान मिळवणार आहे.
3 / 5
कुलदीप यादव 2017 ते 2023 या कालावधीत 103 वनडे सामना खेळला आहे. यात 100 डावांमध्ये गोलंदाजी केली असून 5189 चेंडू टाकले आहेत. 29 निर्धाव षटकं टाकली असून 168 विकेट्स घेतल्या आहे.
4 / 5
कुलदीप यादवने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सहा विकेट्स घेतल्यास नावावर आणखी एका विक्रमाची नोंद होणार आहे.वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारताच्या टॉप गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळेल. इरफान पठाण सध्या टॉप 10 मध्ये असून त्याच्या नावावर 173 विकेट्स आहेत.
5 / 5
वनडेत अनिल कुंबले 334 विकेटसह पहिल्या, जवागल श्रीनाथ 315 विकेटसह दुसऱ्या, अजित आगरकर 288 विकेटसह तिसऱ्या, झहीर खान 269 विकेटसह चौथ्या, हरभजन सिंग 265 विकेटसह पाचव्या, कपिल देव 253 विकेटसह सहाव्या, रविंद्र जडेजा 2020 विकेटसह सातव्या, वेंकटेश प्रसाद 196 विकेटसह आठव्या, मोहम्मद शमी 195 विकेटसह नवव्या आणि इरफान पठाण 173 विकेटसह दहाव्या स्थानावर आहे.