World Cup 2023 स्पर्धेतून स्टार बॉलर आऊट, या खेळाडूची एन्ट्री
Icc World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप दरम्यान टीमला मोठा झटका लागला आहे. टीमचा स्टार गोलंदाज हा ऐन वर्ल्ड कप स्पर्धा रंगात असताना बाहेर पडलाय. त्यामुळे टीम अडचणीत सापडलाय.
1 / 5
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. टीमचा स्टार बॉलर स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हॅनरी बाहेर पडला आहे. मॅटला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती.
2 / 5
मॅट हॅनरी याच्या जागी न्यूझीलंड टीममध्ये कायले जेमिन्सन याचा समावेश करण्यात आला आहे.आता जेमिन्सन या संधीचा किती फायदा घेतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
3 / 5
न्यूझीलंडने वर्ल्ड कपमध्ये जोरदार सुरुवात केली. न्यूझीलंडने सलग 4 सामने जिंकले. मात्र त्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचा विजय रथ रोखला. त्यानंतर न्यूझीलंड टीम रस्ता भरकटली. त्यामुळे सलग 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं.
4 / 5
न्यूझीलंड टीम 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र आता न्यूझीलंडसाठी प्रत्येक सामना महत्वाचा असणार आहे.
5 / 5
दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पोहचलीय. टीम इंडियाने गुरुवारी 2 नोव्हेंबरला श्रीलंकेला पराभूत करत सेमी फायनलचं तिकीट 'फायनल' केलं.