रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवला आणखी एक मान, दहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ‘त्रिशतक’

| Updated on: Sep 30, 2024 | 3:58 PM

भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा प्रभाव दिसला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने सामना ड्रॉच्या दिशेने झुकला आहे. असं असूनही भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवशी कमाल करत 7 गडी बाद केले. यात रवींद्र जडेजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

1 / 5
बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. बांगलादेशने 107 धावांवर 3 गडी बाद अशा स्थितीतून चौथ्या दिवशी खेळ सुरु केला. भारताने 126 धावांमध्ये 7 गडी बाद करत 233 धावांवर रोखलं. या सात पैकी एक विकेट रवींद्र जडेजासाठी महत्त्वाची ठरली.

2 / 5
रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेटचा पल्ला पूर्ण केलं आहे. रवींद्र जडेजाने आपल्याच गोलंदाजीववर खालिद अहमदचा झेल घेतला. यासह त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली आहे.

3 / 5
रवींद्र जडेजा हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. रवींद्र जडेजाच्या आधी हा मान बिशनसिंग बेदी यांच्याकडे होता. त्याने 266 बळी घेतले आहेत.

4 / 5
रवींद्र जडेजा 300 विकेट घेणारा जगातील तिसरा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. 433 विकेटसह श्रीलंकेचा रंगना हेराथ हा अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी 362 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.

5 / 5
रवींद्र जडेजा हा आशियातील एकमेव डावखुरा फिरकी गोलंदाज आहे ज्याने कसोटीत 3000 हून अधिक धावा आणि 300 बळी घेतले आहेत.रवींद्र जडेजाने 300 विकेट पूर्ण करताच इम्रान खान आणि कपिल देव सारख्या दिग्गजांना मागे टाकले. (सर्व फोटो- बीसीसीआय)