चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्धच्या क्वालिफायर 1 सामन्यात धोनीच्या चेन्नईने 15 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लेफ्ट आर्म स्पिनर रवींद्र जडेजाने कारकिर्दीतील आणखी एक टप्पा गाठला.
रवींद्र जडेजाने आयपीएल कारकिर्दीतील 150 वी विकेट घेतली. जडेजाने गुजरात टायटन्सच्या दासुन शनाकाला बाद करत आपली 150वी विकेट घेतली.
जडेजा आयपीएलच्या इतिहासात 150 बळी घेणारा पहिला डावखुरा गोलंदाज आहे. तसेच लीगमध्ये 150 बळी घेणारा 10वा खेळाडू ठरला.
आयपीएल क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्या डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये जडेजा अव्वल स्थानी आहे. जडेजा (151), अक्षर पटेल (112), आशिष नेहरा (106), ट्रेंट बोल्ट (105) आणि झहीर खान (102) असे गडी बाद केले आहेत.
राजस्थान रॉयल्सचा लेग-स्पिनर युजवेंद्र चहल (187 विकेट) याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये 183 विकेट्स घेऊन कारकिर्दीचा शेवट केला होता. चहलने नुकताच हा विक्रम मोडला. मलिंगा सध्या 183 विकेट्ससह दुसऱ्या, तर पियुष चावला 177 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.