Marathi News Photo gallery Sports photos Lsg vs mi eliminator ipl 2023 lucknow super giants vs mumbai indians suryakumar ishan piyush marcus stoinis kyle mayers and ravi bishnoi will decided match result
MI vs LSG Eliminator | मुंबईच्या विजयासाठी तिघांची कामगिरी निर्णायक, तर लखनऊच्या या खेळाडूंना रोखण्याचं आव्हान
लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी करो या मरोचा सामना आहे. या निर्णायक सामन्याचा निकाल हा दोन्ही संघांतील 6 मॅचविनर खेळाडूंच्या कामगिरीवर ठरणार आहे.
1 / 8
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएल प्लेऑफ 2023 मधील एलिमिनेटर खेळवण्यात येणार आहे. एलिमिनेटर जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध फायनलसाठी दोन हात करेल. तर एलिमिनेटरमध्ये पराभूत होणाऱ्या टीमला बॅग भरून पॅकअप करावं लागेल. लखनऊची ही सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटर खेळण्याची ही वेळ आहे. तर मुंबई अनेकदा प्लेऑफमध्ये पोहचलीय. मात्र आता परिस्थिती वेगळीय.
2 / 8
मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये पोहचायचं असेल तर सूर्यकुमार यादव इशान किशन आणि पीयूष चावला या तिघांची कामिगरी निर्णायक ठरणार आहे.तर पलटणसमोर लखनऊच्या मार्कस स्टोयनिस, कायले मेयर्स याला रोखण्याचं आणि रवि बिश्नोई याला ठोकण्याचं आव्हान आहे.
3 / 8
सूर्यकुमार यादव याने साखळी फेरीतील 14 सामन्यांमध्ये 511 धावा केल्या आहेत. सूर्याने या दरम्यान एक शतक ही ठोकलंय. सूर्याने अनेकदा मुंबईला एकहाती सामने जिंकून दिलेत. त्यामुळे लखनऊ विरुद्ध सूर्याची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.
4 / 8
ईशान किशन स्टंपमागे धमाल करतोयच. सोबतच ईशान बॅटिंगनेही कहर करतोय. ईशानने आतापर्यंत सातत्याने मुंबईला वेगवान सुरुवात करुन दिलीय. ईशानने 14 सामन्यात 439 धावा केल्या आहेत. त्यामुळे ईशानकडून लखनऊ विरुद्ध अशाच तोडफोड बॅटिंगची अपेक्षा आहे.
5 / 8
पीयूष चावला हा मोस्ट सिनीअर असा फिरकी गोलंदाज आहे. पीयूषकडे अनुभव आहे. पीयूष मुंबईसाठी या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. पीयूषने आतापर्यंत मुंबईला निर्णायक क्षणी विकेट्स घेऊन दिले आहेत. आता पीयूष लखनऊ विरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
6 / 8
तर लखनऊचा मार्कस स्टोयनिसने या हंगामात 368 धावा केल्यात. सोबत त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. स्टोयनिस कमी तिथे आम्ही असा खेळाडू आहे. त्यामुळे पलटणला या स्टोयनिसचा काटा लवकर काढावा लागेल.
7 / 8
तसेच काईल मेयर्स हा लखनऊचा आक्रमक फलंदाज आहे. काईल कोणत्याही क्षणी सामना पालटण्याची क्षमता आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांनी या काईलला वेळीच रोखायला हवं.
8 / 8
मुंबईच्या फलंदाजांसमोर आव्हान असेल ते युवा रबि बिश्नोई याचं. या फिरकी गोलंदाजानं 14 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे पलटणला रविच्या फिरकीचा जरा जपूण सामना करावा लागेल.