Marathi News Photo gallery Sports photos Lucknow super giants vs mumbai indians suryakumar ishan piyush chawla nehal wadhera akash madhwal and jason behrendorff this 6 players will decided match results ipl 2023 lsg vs mi
MI vs LSG | मुंबई इंडियन्स टीमचे 6 खेळाडू ठरणार गेमचेंजर, लखनऊ रोखणार का?
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नव्हती. मात्र आता या खेळाडूंना सूर गवसला आहे. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात या खेळाडूंकडून चमकदगार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
1 / 8
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मंगळवारी 16 मे रोजी सामना होणार आहे. मुंबईने हा सामना जिंकल्यास पलटणची प्लेऑफची दावेदारी आणखी मजबूत होईल. मुंबईचे 6 खेळाडू हे पलटणचा विजय निश्चित करतील. तसेच लखनऊने या 6 जणांना रोखलं, तर त्यांचा विजय नक्की होईल. मुंबईचे हे गेमचेंजेर असलेले 6 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.
2 / 8
इशान किशन मुंबईला गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने शानदार सुरुवात करुन देतोय. इशानने आरसीबी विरुद्ध 42 आणि गुजरात विरुद्ध 31 धावा करत टीमला चांगली सुरुवात दिली होती.
3 / 8
सूर्यकुमार यादव याने सुरुवातीच्या काही सामन्यांमधील अपयशानंतर जोरदार कमबॅक केलं. सूर्याने गुजरात विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर 103 धावांची शतकी खेळी केली. तर आरसीबी विरुद्ध 83 रन्स केल्या होत्या.
4 / 8
नेहल वढेरा याने आरसीबी विरुद्ध 34 बॉलमध्ये 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर गुजरात विरुद्ध 15 रन्स केल्या. वढेराला सूर सापडला आहे. त्यामुळे वढेराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
5 / 8
टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनिंग संघाचा सदस्य आणि मुंबईचा अनुभवी फिरकीपटू पीयूष चावला याने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पीयूषने मुंबईला निर्णायक आणि गरजेच्या वेळेस विकेट्स मिळवून दिल्या आहेत. पीयूष पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पीयूषने आतापर्यंत या हंगामात एकूण 19 विकेट्स घेतल्या आहेत.
6 / 8
आकाश मढवाल याने गुजरात टायटन्स विरुद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या.मढवालने 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 31 धावा देत ऋद्धीमान साहा, शुबमन गिल आणि डेव्हिड मिलर या तिघांना बाद करत मुंबईला चांगली सुरुवात दिली होती. आता लखनऊ विरुद्धही मढवालकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
7 / 8
सन बेहरनड्रॉफ याने आरसीबी विरुद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या. जेसनने विराट कोहली,अनुज रावत आणि ग्लेन मॅक्सवेल या विस्फोटक फलंदाजांना आऊट केलं होतं. या उंचपुऱ्या खेळाडूवर लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मोठी जबाबदारी असणार आहे.
8 / 8
लखनऊसाठी मुंबई विरुद्धच्या सामना हा प्लेऑफच्या दृष्टीने निर्णायक असा आहे. मुंबईला किमान आणखी एका सामन्याचा पर्याय आहे. त्यामुळे लखनऊला जर या आरपारच्या लढाईत जिंकायचं असेल, तर मुंबईच्या या 6 जणांना कोणत्याही परिस्थितीत रोखावं लागेल.