आयपीएलचा 17 वा हंगाम या खेळाडूंसाठी अखेरचा! ‘हे’ 10 खेळाडू निवृत्तीच्या मार्गावर!

| Updated on: May 27, 2024 | 5:32 PM

IPL 2024 Retirement: आयपीएलच्या 17 व्या हंगामातील महामुकाबल्यात सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन ठरली. या हंगामानंतर 10 खेळाडू कोणत्याही क्षणी निवृत्ती घेऊ शकतात.

1 / 10
महेंद्रसिंह धोनी याने आपल्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सला 5 वेळा चॅम्पियन केलं. यंदा ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. धोनीने या हंगामात 161 धावा केल्या.  धोनीचा 17 वा हंगाम अखेरचा ठरु शकतो.

2 / 10
राजस्थान रॉयल्सचा अनुभवी खेळाडू आर अश्विन आयपीएलला अलविदा करु शकतो. अश्विनने या हंगामात राजस्थानसाठी 86 धावांसह 15 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या.

3 / 10
पंजाब किंग्सचा नियमित कर्णधार शिखर धवन याला या हंगामात दुखापतीमुळे बहुतांश सामन्यांना मुकावं लागलं. धवनने 152 धावा केल्या. धवनचा हा अखेरचा हंगाम ठरु शकतो.

4 / 10
केकेआरच्या मनीष पांडे याला या हंगामात फक्त 1 वेळाच बॅटिंगची संधी मिळाली. पांडे निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो.

5 / 10
दिल्ली कॅपिट्ल्सचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने 8 सामन्यांमध्ये 168 धावा केल्या. वॉर्नर आपल्या आयपीएलच्या कारकीर्दीत शेवटच्या टप्प्यात आहे.

6 / 10
गुजरात टायटन्सचा विकेटकीपर फलंदाज ऋद्धीमान साहा हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळतोय. साहाचा हा अखेरचा हंगाम असू शकतो.

7 / 10
मोहित शर्मा पुढील हंगामाआधी किंवा नंतरही निवृत्त होऊ शकतो. मोहितने यंदा या हंगामात 12 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या.

8 / 10
आरसीबीच्या दिनेश कार्तिकने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या एलिमिनेट सामन्यानंतर अघोषित निवृत्ती जाहीर केली. कार्तिकने या हंगामातील 15 सामन्यांमध्ये 326 धावा केल्या.

9 / 10
मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज पीयूष चावला याचा हा अखेरचा हंगाम असेल. चावलाने 11 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या. पीयूष आगामी हंगामाआधी आयपीएलला अलविदा करु शकतो.

10 / 10
लखनऊ सुपर जायंट्सचा अनुभवी अमित मिश्रा याला या हंगामात फक्त 1 सामन्यातच संधी मिळाली. अमितने 2 ओव्हरमध्ये 20 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली. अमित मिश्रा कधीही निवृत्त जाहीर करु शकतो.