महेंद्रसिंह धोनी सोबत झालेल्या भेटीत असं काही घडलंच नव्हतं, स्वत: पत्नी साक्षीने केला खुलासा

| Updated on: Jul 04, 2023 | 6:19 PM

MS Dhoni-Sakshi Anniversary: एमएस धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघं 4 जुलै 2010 साली डेहरादून येथे लग्नबंधनात अडकले होते.

1 / 6
एमएस धोनी आणि साक्षीच्या प्रेम कहाणीबाबत अनेक चर्चा आहेत. या दोघांचं सूत कसं जुळलं. दोघं एकमेकांना ओळखत होते का? वगैरे वगैरे..पण खोट्या गोष्टीत अनेक जण खरं असल्याचं मानतात. आता याबाबत साक्षीनं सर्वकाही सांगून टाकलं आहे. (PC: sakshi dhoni instagram)

2 / 6
महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी लहानपणासून एकमेकांचे मित्र होते, असं सांगितलं जात आहे. धोनीचे वडील पानसिंह आणि साक्षीचे वडील आरके सिंह एका चहा कंपनीत काम करत होते असंही बोललं जातं. (PC: sakshi dhoni instagram)

3 / 6
माही आणि साक्षी एकाच शाळेत शिकत असल्याचीही चर्चा होत असते. पण हे सर्वकाही खोटं आहे. एकत्र शिकत असल्याच्या बातमीला दोघांनी नकार दिला आहे. (PC: sakshi dhoni instagram)

4 / 6
दोघांमध्ये 7 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे एकत्र शिकण्याचा प्रश्नच येत नाही असं महेंद्रसिंह धोनी सांगितलं होतं. दुसरीकडे, साक्षीने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की, रांची लग्नानंतर पहिल्यांदाच गेली होती. (PC: sakshi dhoni instagram)

5 / 6
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांची पहिली भेट 19 डिसेंबर 2007 साली झाली होती. कोलकात्यात टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथे धोनीही होता. साक्षी या हॉटेलमध्ये इंटर्न होती. इंटर्नशिपच्या शेवटच्या दिवशी ती एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून महेंद्रसिंह धोनीला भेटली होती. (PC: sakshi dhoni instagram)

6 / 6
एकमेकांची ओळख झाल्यानंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं. 13 वर्षापूर्वी 4 जुलै 2010 रोजी दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर धोनीच्या बर्डथे दिवशी म्हणजेच 7 जुलै रोजी ती पहिल्यांदा रांचीत आली होती. यापूर्वी साक्षी कधीच रांचीत आली नव्हती. (PC: sakshi dhoni instagram)