IPL 2024 : अंबाती रायुडूने दिली महेंद्रसिंह धोनीबाबत मोठी अपडेट, स्पष्टच सांगितलं की…
आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व असून जेतेपदासाठी 10 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. गेली 17 वर्षे महेंद्रसिंह धोनी अविरतपणे स्पर्धेत खेळत आहे. त्याच्याबाबत अनेक वावड्या उठल्या. मात्र त्या सर्वांवर महेंद्रसिंह धोनी उरून पुरला. आता एकेकाळचा सहकाही अंबाती रायुडूने मोठा खुलासा केला आहे.
1 / 6
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी संघ सज्ज आहे. चेन्नई सुपर किंग्सचा पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी 22 मार्चला चेपॉक मैदानावर होणार आहे.
2 / 6
चेन्नई सुपर किंग्सकडून मधल्या फळीत खेळलेल्या अंबाती रायुडूने महेंद्रसिंह धोनीबाबत मोठी अपडेट दिली आहे. महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या मध्यातच कर्णधारपद सोडून शकतो. रायुडूच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
3 / 6
अंबाती रायुडू म्हणाली की, स्पर्धेतील काही सामन्यांनंतर धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधारपद सोडू शकतो आणि दुसऱ्या खेळाडूकडे सोपवू शकतो. आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर धोनी या फॉरमॅटला रामराम ठोकेले अशीही शक्यता आहे.
4 / 6
धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धा खेळत आहे. एका स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना रायडू म्हणाला की, इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू असल्याने धोनी या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
5 / 6
रायुडूने सांगितलं की, धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यास चेन्नईसाठी हे पर्व कात टाकणारं ठरेल. धोनी पुढच्या हंगामात खेळू शकतो, पण हे सर्व जर तरवर अवलंबून आहे. पण त्याचं खेळणं कठीण आहे.
6 / 6
मला धोनीला फक्त कर्णधार म्हणून बघायचे आहे. धोनी केवळ 10 टक्के तंदुरुस्त असला तरी तो सर्व सामने खेळू शकतो. गुडघ्याला दुखापत असूनही गेल्या मोसमात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे संपूर्ण हंगाम खेळावा, असे रायुडूचे मत आहे.