World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये एकाच दिवसात विक्रमांचा पाऊस, वाचा काय काय झालं ते

| Updated on: Oct 11, 2023 | 4:27 PM

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मंगळवारी डबल हेडर सामने झाले. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका असे सामने झाले. या दोन्ही सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. काय ते वाचा

1 / 12
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात झाला. या दोन्ही सामन्यात धावांचा वर्षाव झाला. तसेच काही विक्रम मोडीत निघाले तर काही रचले गेले.

2 / 12
एकाच दिवशी झालेल्या दोन सामन्यात 5 शतसं, 5 अर्धशतकं, 120 चौकार आणि 26 षटकारांसह 1280 धावांची नोंद झाली.

3 / 12
इंग्लंडकडून डेविड मलान याने शतक ठोकलं. तर कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमा याने श्रीलंकेसाठी शतकं केली. तर मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी शतकी खेळी केली.

4 / 12
अर्धशतकांचं म्हणायचं तर इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टो आणि जो रूट यांनी अर्धशतकं झळकावली. बांगलादेशकडून लिट्टन दास आणि मुशफिकुर रहिमने अर्धशतकं ठोकली. तर श्रीलंकेकडून पथुम निसांकाने अर्धशतक झळकावलं.

5 / 12
इंग्लंडने डेविड मलानच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशसमोर 364 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 227 धावांवर आटोपला.

6 / 12
श्रीलंका आणि पाकिस्तान या सामन्यात कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमा याच्या शतकी खेळीवर 344 धावा केल्या. तर पाकिस्तानने हे आव्हान अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवानच्या शतकी खेळीच्या जोरावर गाठलं.

7 / 12
पाकिस्तानकडून 131 धावांची खेळी करणाराा मोहम्मद रिझवान याच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कामरान अकमलच्या नावावर होता. त्याने 124 धावा केल्या होत्या.

8 / 12
वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा संघ म्हणून पाकिस्तानची नोंद झाली आहे. 345 धावांचं आव्हान पाकिस्तानने 4 गडी गमवून पूर्ण केलं. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या नावावर होता. त्यांनी 2011 वर्ल्डकपमध्ये 328 धावांचं आव्हान गाठलं होतं.

9 / 12
पाकिस्तानने 345 धावांचं आव्हान गाठत आणखी एक विक्रम केला. तो म्हणजे श्रीलंके विरुद्ध आतापर्यंत कोणत्याही संघाने इतक्या धावा चेस केल्या नव्हत्या.

10 / 12
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या एकूण चार शतकं झळकावली गेली. यात श्रीलंकेकडून 2 आणि पाकिस्तानकडून 2 शतकांचा समावेश आहे. एकाच सामन्यात तिसऱ्यांदा 4 शतकांचा विक्रम रचला गेला आहे.

11 / 12
वनडे वर्ल्डकपमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे. विश्वचषकात पाकिस्तानने श्रीलंकेला 8 वेळा पराभूत केलं आहे.

12 / 12
पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यात चौथ्या क्रमांवर आलेल्या दोन्ही संघांच्या खेळाडून शतकं झळकावली. श्रीलंकेसाठी समरविक्रमा याने 108 आणि पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवाने याने 131 धावांची खेळी केली.