Rohit vs Virat : विराट की रोहित? IPL मध्ये दोघांपैकी मजबूत कोण?
Rohit Sharma vs Virat Kohli IPL 2024 MI vs RCB : रोहित शर्मा आणि विराट कोहली, टीम इंडियाचे 2 दिग्गज फलंदाज. या दोघांना तगडा अनुभव आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामात हे आज आमनेसामने असणार आहेत. दोघांपैकी वरचढ कोण?
1 / 8
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स आमनेसामने असणार आहेत. सामन्याला थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
2 / 8
हार्दिक पंड्या हा मुंबई इंडिन्यसचं नेतृत्व करणार आहे. तर फाफ डु प्लेसीस याच्याकडे आरसीबीची धुरा आहे.
3 / 8
आरसीबी आणि मुंबई दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांची स्थिती या 17 व्या मोसमात बिकट आहे. मुंबईने 4 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर आरसीबीने 5 पैकी 1 सामना जिंकलाय.
4 / 8
'हिटमॅन' रोहित शर्मा विरुद्ध 'रनमशीन' विराट कोहली या दोन्ही माजी कर्णधारांच्या कामगिरीकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या निमित्ताने दोघांची आयपीएलमधील आकडेवारी जाणून घेऊयात.
5 / 8
रोहित शर्मा याने 247 आयपीएल सामन्यांमध्ये 42 अर्धशतकं आणि 1 शतकासह 130.63 च्या स्ट्राईक रेटने 6 हजार 329 धावा केल्या आहेत. रोहितची नाबाद 109 ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. रोहितने आतापर्यंत 264 सिक्स ठोकले आहेत. तसेच रोहितने मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्वात तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
6 / 8
तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत आरसीबीकडूनच खेळतोय. विराटने रोहितच्या तुलनेत 5 सामने कमी खेळेले आहेत. मात्र त्यानंतरही योगायोग म्हणजे दोघांचा स्ट्राईक रेट हा 130.63 असा आहे. तसेच विराटने 52 अर्धशतकं आणि 8 शतकांसह 7 हजार 579 धावा केल्या आहेत. विराटचा 113 हा हायस्कोअर आहे. तसेच विराटने आतापर्यंत 246 सिक्स खेचले आहेत. मात्र विराटला आपल्या नेतृत्वात आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकून देता आलेली नाही.
7 / 8
आरसीबी टीम : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), यश दयाल, विजयकुमार वैशाख, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरुन ग्रीन, मोहम्मद सिराज, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, सौरव चौहान आणि अनुज रावत.
8 / 8
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.