मुंबई इंडियन्सने रविवारी 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 213 धावांचं आव्हान मुंबईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह अनेक रेकॉर्ड झाले.
राजस्थान आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत झाली. याआधी राजस्थानने 11 वेळा 200 पेक्षा अधिक धावा करुन विजयी राहिली होती.
राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी केली. राजस्थानला यानंतरही पराभवाचा सामना करावा लागला. यशस्वीला याला कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तसेच आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच डबल हेडरमधील दोन्ही सामन्यात चारही संघांनी प्रत्येकी 200 पेक्षा अधिक धावा केल्या. मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याआधी चेन्नई विरुद्ध पंजाब या सामन्यात यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये चेन्नईने 200 तर पंजाबने 201 धावा केल्या.
यशस्वी मुंबई विरुद्ध हायस्कोअर करणारा अनकॅप्ड फलंदाज ठरला. यशस्वीने 124 धावा केल्या त्याआधी हा रेकॉर्ड पॉथ वॅलथॅटीच्या नावावर होता. पॉलने 2O11 मध्ये 120 धावा केल्या होत्या.
तसेच यशस्वी आयपीएलमध्ये चौथा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरला. या यादीत केएल राहुल 132 धावा, ऋषभ पंत 128 धावा आणि मुरली विजय 127 धावांसह या तिघांचा समावेश आहे.