IPL 2024 MI vs SRH : आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर, सनरायझर्स हैदराबादने मोडले विक्रम
आयपीएल 2024 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला धु धु धुतलं. मुंबईच्या गोलंदाजांना आघाडीच्या फलंदाजांनी सळो की पळो करून सोडलं. नेमका कुठे चेंडू टाकायचं हेच मुंबईचे गोलंदाज विसरून गेले होते. त्यामुळे या स्पर्धेतील सर्वात मोठा स्कोअर रचला गेला आहे.
1 / 6
आयपीएलचं 17वं पर्व सुरु आहे. या स्पर्धेत नवे विक्रम रचले जाणार, तर काही विक्रम मोडले जाणार यात शंका नाही. आयपीएल स्पर्धेतील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगला. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमवून 277 धावा केल्या.
2 / 6
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर केला आहे. तसेच आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर होता. बंगळुरुने 2013 मध्ये 263 धावा केल्या होत्या. तेव्हापासून 10 वर्षे हा विक्रम अबाधित होता.
3 / 6
अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि हेन्रिक क्लासेन यांनी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. तिघांनी जलद अर्धशतकं ठोकली. ट्रेव्हिस हेडने 24 चेंडूत 62, अभिषेक शर्माने 23 चेंडूत 63 आणि क्लासेनने 34 चेंडूत नाबाद 80 धावांची खेळी केली.
4 / 6
सनरायझर्स हैदराबादने फलंदाजी करताना 18 षटकार आणि 19 चौकार मारले. पॉवरप्लेमध्ये 81 धावा केल्या. हा आतापर्यंत सर्वात मोठा आकडा आहे.
5 / 6
सनरायझर्स हैदराबादने 10 षटकात 148 धावांचा विक्रमही नोंदवला आहे. तर मार्करम आणि क्लासेननं फक्त 51 चेंडूत शतकी भागीदारी केली.
6 / 6
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रेव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.