AUS vs BAN : मिचेल स्टार्कने वर्ल्डकपमध्ये रचला इतिहास, लसिथ मलिंगाला टाकलं मागे
आयपीएल लिलावात मिचेल स्टार्कच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळाला. आजवरची सर्वात मोठी बोली त्याच्या नावावर लागली. इतकंच काय केकेआरच्या जेतेपदात त्याचा मोलाचा वाटा राहिला. मिचेल स्टार्क असाच मोठा नाही. वर्ल्डकपमधील रेकॉर्ड पाहून याचा प्रचिती येते. आता काय केलं जाणून घ्या
1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलियाने बांग्लादेश 28 धावांनी पराभूत केलं. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळाला. असं असलं तरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
2 / 5
मिचेल स्टार्कने बांगलादेशविरुद्ध चार षटकं टाकली. यात त्याने 21 धावा देत एक गडी बाद केला आणि विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम आधी श्रीलंकन कर्णधार लसिथ मलिंगाच्या नावावर होता. (Photo : PTI)
3 / 5
टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मिचेल स्टार्कने एकूण 95 गडी बाद केले आहेत. या विकेटसह मिचेल स्टार्क वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. मलिंगाने वर्ल्डकप करिअरमध्ये 94 गडी बाद केले आहेत. (Photo : PTI)
4 / 5
मिचेल स्टार्कने हा विक्रम मोडला असला तरी आता तो शाबूत ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. कारण बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन या विक्रमाच्या जवळ आहे. त्याला फक्त तीन गडी पाहीजेत. सुपर 8 फेरीत अजून दोन सामने खेळायचे असून हा विक्रम मोडू शकतो. (Photo : PTI)
5 / 5
मिचेल स्टार्कने टी20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत. तसेच एकूण 30 विकेट घेतले आहेत. टी20 वर्ल्डकपमध्ये 49 विकेट घेत शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर आहे. (Photo : PTI)