ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात घेतलं आहे. यासाठी व्यवस्थापनाने 24.75 कोटी रुपये मोजले आहेत. आयपीएल इतिहासातील स्टार्क सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
मिचेल स्टार्क हा फक्त गोलंदाज आहे. म्हणजेच 2024 आयपीएल स्पर्धेत फक्त गोलंदाजीतून आपलं योगदान देणार आहे. दोन बाउंसच्या नव्या नियमामुळे त्याला इतका भाव मिळाला. मिचेल स्टार्क साखळी फेरीतील 14 सामन्यात गोलंदाजी करेल.
मिचेल स्टार्क 14 सामन्यातील प्रत्येक सामन्यात 4 षटकं टाकेल. म्हणजेच 336 चेंडू टाकणार आहे. त्याला मिळालेल्या 24.75 कोटींची फोड केली तर त्याला प्रति चेंडूसाठी 7.40 लाख रुपये मिळतील.
कोलकाता नाईट रायडर्स अंतिम फेरीपर्यंत पोहोचली तर स्टार्क जास्तीत जास्त 17 सामने खेळू शकेल. म्हणजेत त्याच्या वाटेला 408 चेंडू येतील. तेव्हा स्टार्कच्या प्रति चेंडूची किंमत कमी होत 6.1 लाख होईल.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला मिचेल स्टार्क किती सामने खेळतो हे देखील महत्त्वाचं आहे. कारण एखाद दुसऱ्या सामन्यात फेल गेला तर कोलकात्याला महागात पडेल. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघाला किती सामने जिंकून देतो हे पाहावे लागेल.
कोलकाता नाईट रायडर्स | श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, मिचेल स्टार्क, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गेस एटकिंसन, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, शेरफेन रदरफोर्ड, साकिब हुसैन आणि चेतन सकारिया.