Mohammed Shami | मोहम्मद शमी याचा वर्ल्ड कपमध्ये भीमपराक्रम, दिग्गजांना पछाडत ठरला पहिलाच भारतीय
Most Wickets In World Cup By Team India | मोहम्मद शमी याने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये इतिहास रचला आहे. शमी टीम इंडियाकडून वेगवान सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
1 / 6
मोहम्मद शमाीने इतिहास रचला आहे. मोहम्मद शमी याने श्रीलंका विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. शमीने यासह वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.
2 / 6
मोहम्मद शमी टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय. शमीला या सामन्याआधी 5 विकेट्सची गरज होती. शमीने 5 विकेट्स घेत टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान याचा विक्रम मोडीत काढलाय. आता शमीच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये 45 विकेट्स झाल्या आहेत.
3 / 6
मोहम्मद शमीच्या आधी झहीर खान आणि जवागल श्रीनाथ याच्या नावावर सर्वाधिक विकेट्सचा विक्रम होता. झहीरने टीम इंडियसाठी वर्ल्ड कपमध्ये 44 विकेट्स घेतल्या होत्या.
4 / 6
जवागल श्रीनाथ यांनीही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली. श्रीनाथ यांनी वर्ल्ड कपमध्ये 44 विकेट्स मिळवल्या.
5 / 6
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा हुकमाचा एक्का राहिलाय. बुमराहने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत.
6 / 6
तसेच अनिल कुंबळे याच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये 28 विकेट्स मिळवल्या आहेत. कुंबळेने अनेकदा भारतासाठी मोठी भूमिका बजावली आहे.