एकदिवसीय क्रिकेट विश्वात आतापर्यंत एकसेएक गोलंदाज झाले. मात्र त्यापैकी काही गोलंदाज हॅटट्रिक घेण्यात अपयशी ठरले. मात्र असे 5 गोलंदाज आहेत, ज्यांनी एकपेक्षा अधिक वेळा हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याचा विक्रम हा लसिथ मलिंगा याच्या नावावर आहे. मलिंगाने वनडेत एकूण 3 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.
वनडेत सर्वाधिक हॅटट्रिक घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांमध्ये टीम इंडियाच्या एकमेव गोलंदाजाचा समावेश आहे. टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने तब्बल 2 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.
न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट यानेही एकपेक्षा अधिक वेळा हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. बोल्टने एकूण 2 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.
पाकिस्तानचा दिग्गज माजी गोलंदाज वसीम अक्रम यानेही एकपेक्षा अधिक हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. अक्रमने 2 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.
वनडेत श्रीलंकेसाठी एकूण दोघांनी हॅटट्रिक घेतली आहे. लसिथ मलिंगा याच्यानंतर चामिंडा वास दुसऱ्या स्थानी आहे. वासने एकूण 2 वेळा सलग 3 विकेट्स घेण्यात यश मिळवलं आहे.