Test Cricket : 2024 मध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?
टेस्ट क्रिकेटमध्ये खेळाडूंची खऱ्या अर्थाने 'कसोटी' लागते. अनेक संघांनी 2024 वर्षात कसोटी सामने खेळले. त्यापैकी कोणता संघ टेस्टमध्ये बेस्ट ठरला? जाणून घेऊयात.
1 / 8
शेजारी पाकिस्तानने 2024 वर्षात 7 कसोटी सामने खेळले. पाकिस्तानला 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं. तर 2 वेळा पराभूत व्हावं लागलंय. (Photo Credit : Pakistan Cricket X Account)
2 / 8
श्रीलंकेने 2024 वर्षात 10 सामने खेळले. श्रीलंकेने 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला. तर 4 वेळा पराभूत व्हावं लागलं. (Photo Credit : Angelo Mathews X Account)
3 / 8
इंग्लंडने 17 कसोटी सामने खेळले. इंग्लंडने 9 सामने जिंकले. तर 8 वेळा पराभव झालाय. (Photo Credit : England cricket X Account)
4 / 8
न्यूझीलंडने 2024 वर्षात 12 सामने खेळले. न्यूझीलंडने त्यापैकी 6 सामने जिंकले तर तितकेच सामने गमावले. न्यूझीलंडने भारत दौऱ्यात टीम इंडियाला 3-0 ने व्हाईटवॉश केला होता. (Photo Credit : Blackcaps cricket X Account)
5 / 8
बांगलादेशने 2024 या वर्षात 10 कसोटी सामने खेळले. बांगलादेशला फक्त 3 सामनेच जिंकता आले. तर 7 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. (Photo Credit : bangladesh cricket X Account)
6 / 8
दक्षिण आफ्रिकेने 10 पैकी 6 सामने जिंकले. तर 1 सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या साखळीतील अंतिम फेरीत पोहचणारी पहिली टीम ठरली. (Photo Credit : Proteas Men X Account)
7 / 8
ऑस्ट्रेलियाने 2024 या वर्षात 9 सामने खेळले त्यापैकी 6 वेळा विजय मिळवला. तर 2 सामन्यात पराभव झाला. तसेच 1 सामना हा बरोबरीत सुटला. (Photo Credit : Cricket Australia X Account)
8 / 8
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 15 सामने खेळले. रोहितसेनेने 8 सामन्यात विजय मिळवला. तर 6 वेळा पराभूत व्हावं लागलं.तर 1 सामना अनिर्णित राहिला. (Photo Credit : Bcci X Account)