World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत भारताचा एकमेव कॅप्टन
ICC World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचं हे 13 वं पर्व आहे. आतापर्यंत झालेल्या 12 पर्वात अनेक विक्रम नोंदवले गेलेत. त्यात कर्णधारपदाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरली. कोणच्या कारकिर्दित किती सामने जिंकले हे जाणून घ्या.
1 / 5
रिकी पॉटिंग हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाला 2003 आणि 2007 वनडे वर्ल्डकप त्याच्या कॅप्टन्सीत मिळाला आहे. सलग दोन विश्वचषक जिंकून त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे. दुसरीकडे पॉटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 29 विश्वचषक सामने खेळले. त्यापैकी 26 सामन्यात विजय मिळवला.
2 / 5
यशस्वी कर्णधारांच्या यादीत वेस्ट इंडिजचा क्लाइव्ह लॉइड याचं नाव येतं. वनडे वर्ल्डकप 1975 आणि 1979 मध्ये त्याने वेस्ट इंडिजचं नेतृत्व केलं. क्लाइव्हच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने 17 विश्वचषक सामने खेळले. त्यापैकी 15 सामन्यात विजय मिळवला.
3 / 5
न्यूझीलंड संघाला वनडे वर्ल्डकप जिंकण्यात अजून यश आलेलं नाही. गेल्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तरीही या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन प्लेमिंग तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 27 सामन्यात नेतृत्व केलं आणि 16 वेळा विजय मिळवून दिला.
4 / 5
वनडे वर्ल्डकप इतिहासाताली एमएस धोनी हा चौथा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने 28 वर्षांनी वर्ल्डकप जिंकला होता. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 17 सामने खेळले आणि 14 सामन्यात विजय मिळवला.
5 / 5
पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने 1992 मध्ये विश्वचषक जिंकला. इम्रानने 22 सामन्यात संघाचं नेतृत्व केलं आणि 14 सामन्यात विजय मिळवून दिला.