Ranji Trophy जिंकल्यानंतर मुंबईवर पैशांचा पाऊस, एमसीएने तिजोरी उघडली, प्राईज मनी डबल
Ranji Trophy Final Prize Money | मुंबई क्रिकेट टीमला रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर दुप्पट फायदा झाला आहे. विदर्भाला पराभूत करत 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या मुंबईसाठी एमसीएनेही पेटाला उघडला.
1 / 6
अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई टीमने विदर्भावार मात करत रणजी ट्रॉफी जिंकली. सामन्यानंतर विजेता मुंबई आणि उपविजेत्या विदर्भावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. दोन्ही संघांना बक्षिस म्हणून भरगच्च रक्कम मिळाली.
2 / 6
तनुष कोटीयन याने या हंगामात मुंबईसाठी ऑलराउंड कामगिरी केली. तनुषच्या कामगिरीची दखल घेत त्याची प्लेअर ऑफ द सीरिज म्हणून निवड करण्यात आली. तनुषला 2 लाख 50 हजार रुपांयाचा चेक देण्यात आला.
3 / 6
तसेच मुशीर खान याने अंतिम सामन्यात शतकी कामगिरी केली. मुशीर खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. मुशीरला 50 हजार रुपयांचा चेक देण्यात आला.
4 / 6
आपला अखेरच्या सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णी याचा विशेष सन्मान करण्यात आला. धवलला विशेष स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
5 / 6
तसेच मुंबईकडून कॅप्टन अजिंक्य रहाणे याने 5 कोटी रुपयांचा धनादेश घेतला. एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने यावेळेस आणखी 5 कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
6 / 6
तसेच विदर्भाने जोरदार फाईटबॅक देऊन पलटवार करण्याचा प्रयत्न केला. मात्र विदर्भाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. विदर्भाला 3 कोटी रुपये देण्यात आले.