टीम इंडियाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता रोहित शर्मा त्याची आयपीएल टीम मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी, मुंबईच्या संघाने 12 दिवसांच्या स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कॅम्पचे आयोजन केले आहे. यासाठी त्यांचे खेळाडू कंपूत दाखल होऊ लागले आहेत.
रोहित शर्मा त्याची मुलगी समायरासोबत हॉटेलमध्ये पोहोचला. त्याच वेळी, बुमराह त्याच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी एकटाच दिसला होता. हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळून परतले आहेत.
या दोघांशिवाय, संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनलाही एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे तो स्वतंत्र विमानाने बंगळुरूहून मुंबईला पोहोचला. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर ईशान बायो बबलचा एक भाग झाला आहे.
संघाच्या सराव सत्रात क्रिकेट संचालक झहीर खान व्यतिरिक्त, महेला जयवर्धने, शेन बाँड, रॉबिन सिंग, किरण मोरे, विनय कुमार याशिवाय टीए सेकर उपस्थित राहणार आहेत जे मुंबईत आधीच उपस्थित आहेत.