नाथन लियॉनच्या शिरपेचात मानाचा तुरा, शेन वॉर्न-ग्लेन मॅक्ग्रानंतर अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केलं. मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात नाथन लियॉन सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विक्रम रचला आहे. शेन वॉर्न आणि ग्लेन मॅक्ग्रा यांच्यानंतर 500 कसोटी बळी घेणारा नाथन लियॉन हा तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे.
1 / 6
पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर फहीम अश्रफच्या विकेटसह नाथन लियॉनने एक विक्रम रचला आहे. नाथन लियॉनने पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात सातव्या षटकात ही कामगिरी केली. या खेळीपूर्वी नाथन लियॉनने 499 विकेट घेतल्या होत्या.
2 / 6
नाथन लियॉनने पहिल्या डावात 3 बळी घेतले होते. दुसऱ्या डावात त्याने 2 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून 500 कसोटी बळी घेणारा नाथन लियॉन तिसरा गोलंदाज आहे. दिग्गज शेन वॉर्न आणि ग्लेन मॅक्ग्रा यांनी ही कामगिरी केली आहे.
3 / 6
कसोटी सामन्यापूर्वी नाथन लियॉनने 496 विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या डावात त्याने अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक आणि आमेर जमालचे बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने फहीम अश्रफ आणि आमेर जमालची विकेट घेतली. आता त्याच्या नावावर 501 विकेट्स आहेत.
4 / 6
नाथन लियॉनने इंग्लंड आणि भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद केले आहेत. त्याच्या 500 विकेटपैकी 110 इंग्लंडविरुद्ध आणि 121 भारताविरुद्ध आहेत.
5 / 6
नाथन लियॉनने 123 कसोटी सामन्यांमध्ये 500 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. एकूण 8 गोलंदाजांनी 500 विकेट घेतल्या आहेत. यातील 5 वेगवान गोलंदाज आहेत.
6 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहेत. त्याने 133 सामन्यात 800 बळी घेतले आहेत. शेन वॉर्नने 145 कसोटीत 708 विकेट्स, जेम्स अँडरसनने 183 सामन्यात 690 विकेट, अनिल कुंबळेने 132 सामन्यात 619 विकेट, स्टुअर्ट ब्रॉडने 604 विकेट, ग्लेन मॅकग्राने 124 कसोटीत 563 विकेट्स, वॉल्शने 132 कसोटीत 519 विकेट घेतल्या आहेत.