स्कॉटलँडवर 4 विकेट्सने विजय मिळवत नेदरलँड वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पात्र ठरणारी दहावी टीम ठरली आहे.
नेदरलँड यासह 12 वर्षांनंतर पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे.
नेदरलँडने अखेरचा वनडे वर्ल्ड कप 2011 मध्ये खेळला होता. या वनडे वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं.
नेदरलँडची वर्ल्ड कप स्पर्धेत पोहचण्याची पाचवी वेळ ठरली आहे.
नेदरलँडने याआधी 1996, 2003, 2007 आणि 2011 साली वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरली होती.